A beautiful poem I received from my friend Madhur, upon becoming a mother.
आई
आई …वेगळीच असते.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.
खरच... आई किती वेगळी असते.
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहिण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
जीवन हे शेत तर आई म्हणजे विहिर
जीवन हे नौका तर आई म्हणजे तीर
जीवन हे शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दुःखे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंडगार पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
No comments:
Post a Comment