एक उत्स्फूर्त आणि मनोज्ञ श्रध्दांजली ....
समर्पण
नावाड्याच्या पोराचे
खडतर बालपण,
स्वप्न ध्यानीमनी
संशोधन,उच्च शिक्षण।
खडतर बालपण,
स्वप्न ध्यानीमनी
संशोधन,उच्च शिक्षण।
स्वदेशी अग्निबाण
अंतराळी उड्डाण,
यश संपदेला
विज्ञानाचे अधिष्ठान ।
अंतराळी उड्डाण,
यश संपदेला
विज्ञानाचे अधिष्ठान ।
कुराण आणि गीता
अभ्यास समसमान,
नाही कदापि वृथा
धर्माचा अभिमान ।
अभ्यास समसमान,
नाही कदापि वृथा
धर्माचा अभिमान ।
बालगोपाल मेळ्यात
विरघळले मोठेपण,
राष्ट्रपती भवनी
उजळले साधेपण ।
विरघळले मोठेपण,
राष्ट्रपती भवनी
उजळले साधेपण ।
अध्यात्मिक आचरण
जपले शुद्ध माणूसपण
"स्वप्ने बघा मोठी"-सांगत
देह झाला समर्पण ।
जपले शुद्ध माणूसपण
"स्वप्ने बघा मोठी"-सांगत
देह झाला समर्पण ।
-डाॅ सुजाता जोशी पाटोदेकर.नांदेड.
9421987915.
No comments:
Post a Comment